Sunday, February 28, 2016

बदल : यमन ते काफी

या आठवड्यात राग काफी सुरु केला … गेले ६ - ७ महिने आम्ही यमन वर काम करत होतो….

राग यमन : तीव्र मध्यम  , आरोहात वर्ज्य पंचम आणि आता काफी : कोमल गंधार , कोमल निषाद आणि संपूर्ण राग

बरं no more technical terms.. let me get to the point !

आता फक्त हे दोन बदल पण मला सतारीवर साधी सपाट (सा रे ग म प ध नि सा) सुद्धा वाजवता येईना …. अर्रे बापरे … किमान  तास तरी मी नक्की चुकीचं वाजवत असेन !! कान , हात , डोकं यांचा काही ताळमेळ लागेना … कधी शुद्ध गंधार , कधी तीव्र मध्यम … कधी पंचम सोडून दिला !
यमन ते काफी हा प्रवास म्हणावा तितका सोपा नव्हता !! (अजून सुरूच आहे)

मला अजिबात वाटल नव्हतं कि हे एवढा गोंधळ उडेल माझा …

त्या रात्री घरी येताना  डोक्यात असच चक्र सुरु झाल…. एवढे साधे सोपे बदल उमजायला किती मेहनत घ्यावी लागते आणि किती सबुरीने घ्याव्या लागतात गोष्टी !

आणि आपली स्वतःकडून बदल पटकन समजून घ्यायची आणि घडवायची  अपेक्षा असते ! Over confidence!!! मला पटकन बदलाशी जुळवून घेता येतं वगैरे वगैरे  …. पण अस काही झालं न कि लक्षात येतं …. वेळ तर लागतोच … कमी किंवा जास्ती …. आणि महत्वाचं मेहनत लागते !

एखादा राग त्याचा थाट , त्याचे स्वर मनात बसायला , भिडायला वेळ लागणारच … instant maggie चा जमाना असेल तरीही वेळ लागतोच …. आणि जरी परिस्थिती ने सगळं काही घडवून आणलं तरी आपल्याला बदलायला वेळ तर लागतोच !

मला हवे ते बदल आत्ताच्या आत्ता झाले पाहिजेत किंवा बास आता मी नाही थांबू शकत किंवा एवढा वेळ कशी लागतो का कधी … असं सगळं म्हणून processes किंवा नशीब किंवा परिस्थिती यांना नावं ठेवायच्या आधी आता मी स्वतःला फक्त एवधीच आठवण  करून देणार आहे

"आठवतंय न काफी चा पहिला दिवस आणि बेसूर सपाट  !"


No comments:

Post a Comment