Sunday, February 21, 2016

सहजच !!

असंच बोलता बोलता बराच काही आपण बोलत असतो …. त्या बरंच काही मधलं थोडसं !
----
गर्दी


कधी कधी या गर्दीत माणसं अशी हरवतात कि पुन्हा कधीच दिसत नहित. 
खरा तर आजच्या "connected world" मध्ये  "untraceable" असण अशक्यप्राय वाटत 
पण काहीच अशक्य नाही अस लक्षात येतं !!


------

विषयांतर

आज अजिबात विषयांतर नाही … पहिल्या गोष्टीवरच चर्चा …


विषयांतर यावरच विषयांतर होत मग! आणि मग कोणी विषयांतर केल होतं त्यावर चर्चा !


-------

गुंता 

कधी कधी इतका वैताग येती गुंता सोडवताना … नक्की काय केल होत म्हणून एवढा तो गुंता !
पण काय केलं असा विचार केला काय किंवा नाही केला काय , गुंता तर सोडवावा लागतो 

कदाचित पुढच्या वेळी गुंता कमी होईल पण झालेला गुंता तर सोडवावाच लागतो !!

आणि गुंता का झाला या विचारावर विचार करता करता अजून गुंता !


----

पण … 

एखाद्या वाक्याच्या मध्यभागी "पण" आल तर त्याचा पहिला भाग सोडून द्यायचा असतो 

मी माफी मागते पण XXXXXXX

जर XXXX  तर कशाला माफी मागायची !! !

इथे सेल आहे पण फक्त या गोष्टींवर 
(आपल्या ला हव्या त्यावर तो नसतोच :( )


----

आज मी लवकर घरी जाणार आहे…
आत्ता किती वाजलेत घड्याळ्यात ?

ओह्ह ७ वाजले का ? उद्या नक्की मी लवकर निघणार ऑफिसमधून


-----

No comments:

Post a Comment