बनतो . त्यात एक stunt आहे कि एका फळीवर एक कापड लटकलेल असत … ती फळी एक २० फुटांवर असेल जमिनीपासून …. ते कापड दोन्ही बाजूंनी लटकत असत …आता त्या कापडावर लोंबकळत पुढे यायच आणि मग खाली उडी मारायची …. खूप लोकांना जमला नाही हे … कापडावर लोम्बालात सगळे पुढे आले त्यापुढे किनालाही जाता येईना … मग एकाने ते पार केला ! आणि त्याने बाकीच्यांपेक्षा एकाच गोष्ट वेगळी केली होती … त्याने उडी मारताना दोन्ही हात सोडले ! मग माझ्या डोक्यात सुरु झाल नेहमीच विचार चक्र !
एखादी गोष्ट आपण जर पूर्णपणे झोकून देऊन केली नाही तर ती नीट होताच नाही ! आपण आपलं उडी मारताना एक हात त्या कापडाला धरून आणि दुसरा सोडतो पण अस एक हात सोडून काही काही होणार नाहीये :) दोन्ही हात सोडणं महत्वाच ! ते म्हणतात ना किनारा नजरेसमोर ठेवून कधीच नवीन खंड सापडत नाहीत … तसच आहे हे…
I always want to take a leap into unknown keeping my eye on the known! Well thats playing safe. It might take me somewhere but may be not where I want to be!
--
म्हणायला तर मी एकदम विश्वास ठेऊन उडी मारत आहे पण एका हाताने मी माझ्या वर्तमानाला घट्ट धरला आहे ! अशाने नाही तर वर्तमान नाही तर भविष्य !
:) काय फिलोसोफिकल झालय हे !
----
जाऊ देत साध्या सोप्या भाषेत , जोपर्यंत संपूर्ण विश्वास ठेवून झोकून देत नाही तोपर्यंत काहीही करणं शक्य नाही … एक हात इथे , एक हात तिथे केल तर राहणार लटकत !!
No comments:
Post a Comment