Sunday, May 31, 2015

वक़्त मिला तो सोचेंगे

वक़्त मिला तो सोचेंगे

कुठे चाललीये मी , कुठे धावतीये मी …
काय करतीये मी , कोण आहे मी
वक़्त मिला तो सोचेंगे !!


क्षणां- क्षणांनी आयुष्य पुढे जातंय …
नक्की काय काय बदलतंय ?
वक़्त मिला तो सोचेंगे !!

या घाईगर्दीत , कित्येक माणसं हरवली
कितीतरी नाती विसरली , नक्की काय गमावल ?
वक़्त मिला तो सोचेंगे !!

त्या टेकडीवरच्या गप्पा, मावळणारा सुर्य
खळखळून हसण , नक्की कुठे गेल ते ?
वक़्त मिला तो सोचेंगे !!


हा नवा प्रवास , संपवायची घाई …
पण नक्की दिशा मात्र कोणती घ्यावी ?
वक़्त मिला तो सोचेंगे !!


मनातल्या मनात राहिलेले विचार…
कधीही न व्यक्त केलेल्या भावना … 
बोलायचे राहून गेलेले शब्द … 
अस्ताव्यस्त पसरलेले विचार… 


पण उत्तर एकच 
वक़्त मिला तो सोचेंगे !!

-----------


1 comment:

  1. Wa!! मात्र वेळ काढावाच लागेल नाहीतर सगळ्याच गोष्ठी आन्नुत्रित राहतील...

    ReplyDelete