Sunday, January 18, 2015

पोस्टाची गम्मत !

आपण पुणेकर नेहमी स्वतःची स्तुती करत असतो ! आपला वागणं , टोमणे , पाट्या वगैरे वगैरे …

ह्या वेळी मला पोस्टामुळे खूप वेगळा अनुभव मिळाला … This time I was on the other side of the table :(

तर आता जर नाट्यमय किस्सा

मी पोस्टात गेले होते , बाबांनी काही काम सांगितल होतं आणि ते माझ्या साहिनेच होणार होतं !
मग बुधवार सकाळी १० वाजता मी गेले पोस्टात … पहिली गोष्ट , एवढ्या कोपर्यात आहे ते ऑफिस , कि मला दिसलाच नाहि आत कुठून जायच … आत गेले तर ऑफिस फक्त आतली लोक बसतील एवढी खोली होती आणि मी आणि माझ्यासारखी बाकीची लोकं बाहेर उभी होती !

मग खूप वेळाने , साधारण ५० मिनिटांनी माझा नंबर आला आणि मी माझा काम काय आहे ते सांगितल… त्यांनी एक फॉर्म दिला , जो भरून त्यांना परत द्यायचा होता … मी फॉर्म भरला , सही केली आणि काकूंना कागद दिला … काकूंनी हातानेच तिथे जाउन बस अस सांगितल… तब्बल २५ मिनिटांनी मला काकूंनी पुन्हा बोलावलं आणि म्हणाल्या कि अजून एक address proof लागणार आहे , आता मी जेव्हा पहिल्यांदा विचारला होता , काय काय लागता तेव्हा काकू म्हणाल्या आधार कार्ड पुरेस आहे… आता ५० + २५ मिनीट थांबल्यावर अजून एक address proof. मग मी आईला  फोन केला , ती driver काकांना पाठवणार होती वीज बिल घेऊन …. आता माझ्या कडे  २ address proofs होती … मी काकूंना ती दिली … तर काकू म्हणाल्या कि फोटो सुद्धा लागतो …. ह्यांना सगळं एकत्र सांगायला काय झाला होत ?  मग आता पासपोर्ट चा फोटो आणायला पुन्हा कोणाला तरी सांगणार ? एव्हाना १२:२५ झाले होते …आणि १ वाजता पोस्ट बंद होणार :( ….

मग मी एक सेल्फी काढला , आणि जवळच एक प्रिंटींग च दुकान होत… तिथे गेले , त्यांना तो फोटो इमेल केला … मग काकांनी हळू हळू आपला वेळ घेत , एक एक अक्षर type करत इमेल उघडला …. आणि त्यांना म्हणल कि मला एक पासपोर्ट च्या आकाराचा फोटो हवा आहे …. काका म्हणाले आमच्याकडे फक्त a३ कागद आहेत… मी म्हणाले कि असू देत तरी मला एकाच फोटो हवा आहे… तर काका म्हणतात कि असेही तेवढेच पैसे लागणार आहेत तर जास्त प्रिंट काढून घे… मग ५० एक फोटो येतील …. आता माझ्याकडे फक्या २५ मिनिट उरली आहेत…. मग ते पन्नास एक फोटो मिळाले तर ते फोटो बघून काका म्हणतात , background काही बरोबर नाही …. आता माझ्याकडे अजिबात वेळ नवता चर्चा करायला आणि काकाची माझ्या फोटोवर विशेष टिपण्णी सुरु …

मी कशीबशी तिथून निघाले आणि धावतच पुन्हा पोस्टात गेले… आता माझ्याकडे त्यांनी मागितलेल सगळ होता … आता जर काकूंनी काही अजून आन अस म्हणाल असत तर …

मला बघून त्यांनी पुन्हा हातानेच खूण केली ये म्हणून …. एक बरं झाला कि पुन्हा थांबायला लागल नाही …
आता एक ला १० मिनिटे कमी होती …

मला वाटल चल एकदाच काम झाल…. पण काकू मला म्हणतात तुझ हस्ताक्षर खूप खराब झालाय … जुनी सही आणि नवीन सही जुळत नाहीये … आता तर कहर झाला ! १२ वर्षांपुर्णी केलेली सही आणि आजची सही यात फरक येणारच ना?

त्या म्हणाल्या मी हे काम करू शकत नाही , सही जुळली नाही तर ….पुन्हा फॉर्म भरावा लागेल आणि आता एक ला ६ मिनिटे कमी होती ….  मग मी पुन्हा फॉर्म भरला आणि त्यांनाच विचारला कि जुना नमुना दाखवता का ? त्यांनी चिडून ती जुनी सही दाखवली आणि मग मी ती सही केली … आता एक ला २ मिनिटे कमी होती … जर आता हे काम झाला नसता तर …… पण नशिबाने त्यांनी माझा काम पूर्ण केल ….


हुश्श …. एकदाची बाहेर पडले त्या पोस्टातून


1 comment:

  1. आर्रे देवा …. complete kissach zala ki...:P...NRI lokanbarobar,,,

    ReplyDelete