आजचा white rock lake खूप खूप वेगळा आहे नेहमी पेक्षा … सूर्यास्त झालाय आधीच आणि खूप खूप थंडी आहे त्यामुळे आसपास चिटपाखरू सुद्धा नाहीये…कडाक्याची थंडी , बेभान सुटलेला वारा , त्यामुळे निर्माण झालेल्या त्या पाण्याच्या लाटा , हातात कॉफी चा कप आणि मी !
आवाज नाही कुठलाच , फक्त वार्याचा झंझावात , गाड्यांचा आवाज नाही , माणसांचा गोंधळ नाही , काही काही नाही….अगदी सामसूम सगळीकडे …पाण्याच्या लाटांचा तो अगदी हळू आवाज … एवढ्या थंडीत पक्षी सुद्धा नाहीयेत आसपास, बदकं सुद्धा दिसेनात पाण्यात …
खर तर मी प्रचंड कुडकुडतीये इथे , लिहिताना अगदी हात थरथरतायत ! पण तरीही बसावसं वाटतंय इथे , हि शांतता आवडतीये … हा बोचरा वारा अनुभवायचा आहे … काय माहित पुन्हा असा योग कधी येईल ?
एवढा वाहणारा वर असून सुद्धा एक स्तब्धता आहे वातावरणात , ती आवडतीये मला मनापासून ! खर तर अजून पुढे जाउन पाण्याच्या अगदी जवळ बसायच आहे…
खर तर सगळ गोठलाय माझ , विचार सुद्धा बहुतेक ,त्यामुळे फार काही सुचतच नाहीये…
माझ आणि या जागेच अस एक वेगळा नात आहे, इथून दिसणार आकाश मला स्वतःचं वाटतं ! इथली झाडं मला माझी वाटतात… इथे आल्यावर एक छान "familiar" feeling येतं ! आणि मग एकदम "philosophical" type वाटायला लागतं ! मजेशीर असतो आपण अगदी ! शांत जागा , निसर्ग वगैरे दिसला कि अचानक आयुष्याबद्दल विचार सुरु !! :) :) :) अचानक आयुष्यातले प्रश्न, त्यांची उत्तरं , अनुभव, आयुष्यातल्या चांगल्या गोष्टी वगैरे वगैरे ! अस करायला हव मी , तस व्हायला हव वगैरे वगैरे , सगळ तत्वज्ञान कस घडाघडा आठवायला लागत !! एकदम स्फुरण चढत , आपण म्हणजे एकदम भारी वगैरे वगैरे वाटण्याचे chances वाढायला लागतात !
बापरे , माझ्या बाबतीत अस होण्याच्या आधी इथून उठलेल बरं ! कारण हे सगळ वाटणं ठीक आहे , पण एकदा इथून उठल्यावर त्याचा संपूर्णपणे विसर पडणार असतो ! घरी जाउन पुन्हा आपल नेहमीच सुरु!!

No comments:
Post a Comment