खरच… काही गोष्टी कधीही न बदलणाऱ्या असतात… कितीही वर्ष उलटली तरीही त्या गोष्टींमध्ये तसूभर सुद्धा फरक जाणवत नाही ! या वेळी जाणवलेल्या काही गोष्टी
मागच्या महिन्यात नाशिकला गेले होते…एका मैत्रिणीच्या निमित्ताने … अगदी २४ तासांपेक्षाही कमी वेळ होते… पण खरंच खूप मस्त वाटलं !! कित्येक जण कॉलेज नंतर आत्ताच भेटले… एवढ्या वर्षांनी सुद्धा तेच जोक्स , त्याच गप्पा आणि तरीही सगळ हवं हवंसं वाटत होतं !!
याआधी नाशिकला मी २००६ मध्ये गेले होते… तब्बल ८ वर्षांनी पुन्हा गेले … सगळ्यात न बदललेली गोष्टं म्हणजे नागलकर काका काकू , दीदी , तुषार आणि घर! मी अगदी लहान असल्यापासून जातीये तिथे ! खरच खूप खूप छान वाटलं … आणि योग योगाने दीदी आणि तुषार ची सुद्धा भेट झाली… इतक्या वर्षांनी जाउन सुद्धा मला तिथे अजिबात नवीन वाटत नव्हतं ! अगदी "At peace , at home" वाटत होतं…अगदी सकाळी बसून पेपर वाचण्याची जागा , नेहमी च्या dining table वरच्या गप्पा , आजीबात न बदललेली खालची रूम !
मस्त एकदम !खरच असच राहील का हे सगळं कायम ? आपली माणसं … आपल्या जागा… सगळ अगदी तसच्या तस !!
आम्ही नेह्मो लातूर ला जायचा रस्ता , भिगवण च तेच हॉटेल…. तिथला तोच नाश्ता ….गेल्या १५ वर्षांपासून आम्ही लातूरला त्याच रस्त्यावरून जातो आणि त्याच ठिकाणी "हॉटेल सागर " मध्ये नाश्ता करतो आणि पुढे तेम्भूर्णी ला "संत सावतामाळी " टपरी वरचा चहा !! I am a BIG fan of that tea! Its been there since I dont know when, I just love their TEA! इतक्या वर्षात त्यांनी टपरी सुद्धा बदलली नाहीये!!
खिडकीतून बाहेर बघताना सुद्धा त्याच ओळखीच्या गोष्टी, दूर वरून दिसणाऱ्या निळ्या छप्परांच्या पेपर कंपनीच्या ईमारती … ती कंपनी दोनदा विकली गेली , ज्याने कोणी घेतली त्याने कधीही निळ्या रंगाच छप्पर बदलण्याचा विचार केला नाही वाटतं …. येडशीच्या घाटा नंतर चा cold drink spot! तिथे नेहमी MRP पेक्षा जास्त किमतीत विकल जाणार पाणी आणि कोक! आणि माझा नेहमीच उत्तर माहित असून सुद्धा वाद घालायचा अट्टाहास!! गाडीतली नेहमीची चर्चा आणि कधी हि न संपणारे विषय / वाद !!
काही काही म्हणून बदलत नाही …खरच आणि काही बदलाव असा वाटत सुद्धा नाही !! असू देत असच सगळ!

No comments:
Post a Comment