Sunday, August 25, 2013

On Making choices!

Was watching the latest episode of suits yesterday.
Jessica says, "Sometimes you have to put your family in such a situation where there wont be other choices.It will be the only choice"..It is so true sometimes.

अगदी खर सांगायच तर बरेच पर्याय असल्यावर निर्णय घेण फार फार अवघड होऊन जातं ! मग वाटत , कि नकोच इतके पर्याय !

These days its really crazy, there are hundreds and thousands of options for everything , even if you just want to buy a simple cellphone cover , you will at least find ten thousand different options! These is not just aboiut shopping..Its applicable to everything..

अगदी जन्मल्यापासून आपल्याकडे हजारो पर्याय असतात , कळत - नकळत आपण समोर आलेल्या पर्यायांमधून "योग्य" असा पर्याय निवडायला शिकतो… मला योग्य वाटणारा पर्याय "योग्य " या व्याख्येप्रमाणे असायलाच हवा अस काही नाही … असो तो एक वेगळा मुद्दा आहे…

तर , खरच खूप पर्याय असले तर सर्वात आधी कोण-कोणते पर्याय आहेत त्याचा विचार मग कोणता निवडायचा आणि कोणता नाही निवडायचा याचा विचार , मग जो निवडायचा नाहीये तो नक्की चांगला नाही ना यावर शिक्कामोर्तब आणि मग कुठे आपल्या "योग्य" निवडलेल्या पर्यायाच्या योग्यतेवर विचार…इथे संपत नाही हि साखळी , यानंतर आपण निवडलेल्या पर्यायाच उत्तर दायित्व सुद्धा आपल्यावरच येत ! कारण अनेक गोष्टींमधून आपण हि गोष्ट / हि वाट निवडलेली असते… त्यामुळे माझ्याकडे दुसरा पर्याय नाही अस म्हणून नशिबाच्या/परिस्थितीच्या माथ्यावर पण मारता येत नाही !!

बापरे , वेड लागायची वेळ येईल अशाने !!

वाचायला जरी जड आणि मोठ्ठी असेल तरी मनात आपण हे सगळे विचार कैक क्षणांमध्ये करून टाकतो !


Seriously , having too many options isn't the best option.. It looks very very helpful but it is not! Having more options just confuses me and then I have to think through all the "GOOD" options.. I know so many people who just procrastinate the decision waiting on availability of more choices...

माझ सरळ असोप्पा मत आहे , जे काही वाटत ते करून टाकाव ! (मत असण आणि तस वागणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत !!  :) :) )






No comments:

Post a Comment