Sunday, June 9, 2013

सेनापती

युद्धापूर्वी

युद्ध करण्याची खरच गरज आहे का ते तपासून पाहणारा तो सेनापती…
युद्ध अटळ असल्यास सैन्याचं नियोजन करणारा तो सेनापती….
सैन्याकडून कसून तयारी करून घेणारा तो सेनापती….
प्रत्येक सैनिकाकडे जातीनं लक्ष देणारा तो सेनापती….


युद्धभूमीवर

शंखनाद करून त्या युद्धाचा आरंभ करणारा तो सेनापती….
स्वतःच्या सैन्याची योग्य रचना करणारा तो सेनापती….
शत्रुपक्षाच्या डावपेचांपासून सैन्याचं रक्षण करणारा तो सेनापती ….
प्रत्येकाचं मनोधैर्य वाढवणारा तो सेनापती….
सैन्याला एकवटून ठेवणारा तो सेनापती…
सगळ्यात पहिला वर अंगावर झेलणारा तोच सेनापती….

युद्धानंतर

स्वतःचे वर विसरून जखमींना मलमपट्टी करणारा
प्रत्येकाची विचारपूस करणारा तो सेनापती…
युद्धाच्या थकव्यानंतरही उत्साही असणारा तो सेनापती…
आणि दूरवर उभं राहून सैन्याकडे कौतुकाने पाहणारा तो सेनापती…


कविता नाहीये हि… हे एका सेनापतींचे शब्द एका सेनापतींसाठी…. 

No comments:

Post a Comment