खूप दिवसांनी मस्त "प्रवास वर्णन" आहे माझ्याकडे लिहिण्यासाठी … तस प्रत्येक प्रवासात काहीना काहीतरी होतच असतं माझ्यासोबत !! पण दर वेळी लिहिल जात नाही… हा माझ्या ४ राज्यांच्या (states) धावत्या दौऱ्यातला काही भाग … मी काढलेली सगळी तिकिटे मी या दौर्यामध्ये रद्द केली…मला वाटतंय आता मी "airline charity" वगैरे काहीतरी सुरु कराव… प्रत्येक वेळी काही न काही कारणांमुळे मला नवीन तिकीट घ्यावच लागत !! असो त्याबद्दल नंतर कधीतरी …
स्थळ : फिनिक्स च विमानतळ
वेळ : सकाळी ६
आदल्या रात्री रागिणी सोबत गप्पा मारत बसल्यामुळे मला उठायला आणि निघायला थोडा उशीर झाला… तिचं graduation होत , म्हणून मी अरिझोना ला गेले होते… तो एक अजून मजेशीर किस्सा आहे…
तर सकाळी मी गाडी परत केली आणि पळत पळत security च्या इथे पोचले… काढ इकध ईत्क उच्छाद येतो या सगळ्या security प्रकरणाचा , काय सांगू … मग नेहमी प्रमाणे jacket , liquids, laptop , shoes अशा सर्व गोष्टी मांडून ठेवल्या आणि त्या security च्या गेट मधून आत आले… आता काढलेल्या गोष्टी पुन्हा घालाव्या /ठेवाव्या पण लागतात ना !! त्यात अजून वेळ गेला…
मग गेट जवळ आले आणि लक्षात आलं कि आपल्याकडे अजून १० मिनिटे वेळ आहे… भुकेची जाणीव आधीच झाली होती पण वेळ आहे म्हणाल्यावर ती तीव्र झाली !! मग आसपास बघितल तर cinnabon दिसल… म्हणल चला , आता चं कॉफी आणि सिनमन रोल खाऊया ! तिथे गेले आणि त्यांना सांगितल , " एक कॉफी आणि एक सिनमन रोल "… काय हळू होता तो माणूस, मला वाटल , कि आता हा शेतात जाणार कॉफी बिन्स आणणार मग त्यापासून कॉफी बनवणार , मग कॉफी च्या मशीनचा शोध लावणार , मग कॉफी बृ करून मला देणार !! असाच विचार मी सिनमन रोल बद्दल पण केला, आणि गमतीचा भाग असा, कि मी हा सगळा विचार करेपर्यंत त्या माणसाने या दोन्ही पैकी काहीच मला दिल नव्हतं !! मग मी जर वैतागूनच त्याला म्हणाले , कि माझी फ्लाईट आहे, तुम्ही कृपया जरा लवकर द्याल का ? मी असं म्हनाल्यावर त्याला एवढा राग आला कि त्याने जवळ जवळ कॉफी आपटली !! जाऊदे आत्ता या माणसाच्या नदी लागण्यात काय अर्थ आहे ? आपण भलं , आपली कॉफी भली आणि आपली फ्लाईट सुद्धा !
मग गेट मधून आत जाताना विचार आला, एकदा गौरीला सांगावं मी निघत आहे म्हणून … फोन काढायला पर्स मध्ये हात घातला तर फोन काही मिळेना ! असाही माझ्या पर्स मध्ये गोष्टी पटकन मिळत नाही , पण मिळतात नक्की… पण फोन का मिळेना म्हणून मी अस्वस्थ ! मग जाऊन सीट वर बसले आणि पुन्हा फोन शोधणं सुरु…फोन काही मिळेना , मग मला वाटल कि मी त्या मंद सिनबन च्या इथे फोन विसरले कि काय ?
मग मी पळत पळत गेले , तर गेटच्या इथला माणूस मला सांगतो कि आता बाहेर नाही जाऊ शकत , मी त्याला म्हणाले, जाऊ शकत नाही म्हणजे काय , मला फोन हवाय … आलेच मी
आता परत त्या सिनमन च्या माणसाकडे जाव लागणार , असो । अडला हरी गाढवाचे पाय धरी !!
मग मी त्याला विचारल , "माझा फोन इथे राहिला का?"… तर हा माणूस मला सांगतो , "तुला इतकी घाई होती कि फोन विसरायला सुद्धा वेळ नव्हता !! एक तर माझा फोन सापडत नाहीये , त्यातून या माणसाचे टोमणे ऐका… या जगात खरच किती विचित्र माणस असतात ना…
आता याच्याकडे नाही म्हणजे मी security च्या इथे फोन विसरले असणार , मग मी धावत धावत तिथे गेले, आणि विचारल्यावर तिथल्या माणसाने helpdesk कडे हात दाखवला… मी तिथे गेले आणि तो helpdesk वरचा
मनुष्य काही बोलायच्या आत बोलायला सुरुवात केली…मी श्वास सुद्धा न घेता किमान १० - १ २ वाक्य सलग बोलले… म्हणजे त्याच्या मनात तो फोन माझा आहे कि नाही अशी शंकाच नको यायला ! एवढा बोलल्यावर त्यानेच मला थांबवलं आणि म्हणाला हा घे तुझा फोन !! मी आपलं धन्यवाद म्हणून पुन्हा पळत सुटले ….
आतापर्यंत boarding पूर्ण झाल होत… रस्त्यात पुन्हा सिनाबन लागलच , मग मी हि इथल्या त्या विचित्र माणसाला फोन दाखवत म्हणाले, मिळाला बरं का मला माझा फोन !! इतका मस्त वाटलं त्याला असं म्हणाल्यावर !! विक्षिप्तच होता तो …
मग आता तो गेटवर चा माणूस मला काही म्हणायच्या आत मी संपूर्ण वेगाने धावत त्या metal tunnel मध्ये शिरले… आणि पळत पळत कशी बशी विमानात पोचले , मला अस धावत येताना पाहून आणि एवढ्या धापा टाकताना पाहून , त्या airhostess ने प्रेमाने विचारल , पाणी देऊ का ? , एवढ्या गडबडीत पण मला तिला म्हणावसं वाटल , "हो चालेल ना , लिंबू टाकून!! " … या विचाराने माझं मलाच हसू आलं … नशिबाने मी तिला पाणी नको अस खुणेनेच सांगितल, आणि धन्यवाद म्हणून जागेवर जाऊन बसले …
आता मस्त कॉफी आणि सिनमन रोल खात , खिडकीतून खाली बघताना मला तो गेटवरचा माणूस , सिनबन चा माणूस , security च्या इथला माणूस दिसत होता !! मी आजच किस्सा , गेले ४८ तास आणि त्यातला अभूतपूर्व गोंधळ आठवत असतानाच , मला air hostess ने विचारल , "Would you like to drink anything ?"
आणि मी हसत हसत उत्तर दिल , "Water please , with some lemon in it!! " तिला काही कळलच नाही… मग मी म्हणाले, "Thank you , I am good"
------------------------------------------------------------------------------------------------------

No comments:
Post a Comment