Sunday, November 18, 2012

पुन्हा एकदा वपुर्झा




खरच कुठलं हि पण काढावं आणि वाचावं..

माझ्या अगदी आवडीचं पुस्तक आहे..तसं कधीच पूर्ण वाचलेलं नाही..
आणि तसा प्रयत्न सुद्धा करणार नाही कदाचित..

माझं आणि बाबांचं अतिशय आवडतं पुस्तक आहे..आज खूप दिवसांनी पुन्हा एकदा वपुर्झा उघडलं..
आता इतकं चांगलं वाचून झाल्यावर मी काय लिहिणार ?
म्हणूनच काही ओळी वपुर्झा मधून..

"मी भगवद्गीता , रामायण वाचलेलं नाही, पण मी माझ्यापुरती एक व्याख्या केली आहे..प्रत्येक माणूस म्हणजे महाभारत.महाभारत शब्दाला
समांतर शब्द म्हणजे "षडरिपू " आणि माणसाला त्या शक्तीचा शोध घ्यावासा वाटला , ध्यास लागला कि भगवद्गीता सुरु झाली असं समजावं "


"आयुष्य कोणत्याही सिद्धांतावर चालत नाही.आयुष्य म्हणजे आखून दिलेली पायवाट नव्हे किंवा रेल्वेचे रूळ नव्हेत..ते गंगेच्या प्रवाहाप्रमाणे
सुसाट वाहत आणि उतार गवसेल तसं..त्याच्यासाठी पूर्वनियोजित आखून दिलेला मार्ग नाही.म्हणून आयुष्यालाही दिशा नाही.आपण ठरवलेल्या
दिशेनेच जात राहू , मुक्कामाचं ठिकाण जे निश्चित करू , तिथंच पोचू , हि शाश्वती नाही."

किती खर खरं लिहिलंय ना या पुस्तकात..जे रोज घडतं ते..आयुष्य आहे तसं...काही फंडे न देता सुद्धा सर्व काही सांगणार पुस्तक आहे हे..
अस करा म्हणजे तस होईल अशी बरीच पुस्तक आहेत..पण हे असा आहे अस सांगणरी फारच मोजकी..
आयुष्य बदलण्यापेक्षा जगण महत्वाचं नाही का ?

No comments:

Post a Comment