सीमा , मर्यादा काय मस्त शब्द आहेत ना..
खूप दिवसांनी या ओळी आठवल्या मला
खळ खळ धावत फेसाळत हा सागर उसळुनी येतो
मर्यादांना उल्लंघुनी नव आव्हाना घेतो
मर्यादा पाळण्यासाठी का त्यांचं उल्लंघन करण्यासाठी? मला नक्की काय ते कळतच नाही कधी कधी..
हे अगदी सातवी आठवी मध्ये आई बाबा म्हणायचे तसं झालंय..कधी म्हणायचं तू लहान आहेस अजून आणि कधी म्हणायचं आता मोठी झालीयेस तू ..
खर तर ते आत्ता सुद्धा असं म्हणतात..काय ते ठरवायला नको का त्यांनी..
मर्यादांच पालन करणाऱ्या रामाची आपण पूजा करतो आणि सगळ्या सीमा ओलांडून पलीकडे जाणार्या संत मीरा बाईंची सुद्धा!!
थोडं विचार केला तरी बर्याच वेगळ्या गोष्टी समोर येतात..मर्यादा या पार करण्यासाठीच तर असतात.. जर जगात राष्ट्रांच्या सीमा नसत्या तर कोणी कोणावर
राज्य करण्याचा प्रश्नच आला नसता.. ती सीमा होती म्हणून कोणीतरी ती ओलांडून जग जिंकायला निघाला...जर चौकटी आखलेल्या नसत्या तर त्या चौकटीबाहेर जाऊन
काम करणारी लोक पण नसती का?
These days people are not talking about thinking outside the box. They are talking about thinking as if there was no box!!
No limitations..No boundaries..These limitations might be mental blocks that have created invisible fences or may be true physical limitations(there are not many these days!!)..
No one had ever run a mile in less than four minutes, so this was a limitation, boundary, मर्यादा..but then Sir Roger Gilbert Bannister decided to change it. Once he achieved it , surprisingly many people could. It's like he stretched the boundary. When I read Michael Phelps's book No Limits, I had realized that limits are in our mind.
Not in our physical reality ( this word comes from reading Deepak Chopra :) )
तात्पर्य काय तर मर्यादा नसतील तर कोणी त्यांना उल्लंघून जाणार नाही आणि सीमाच नसतील तर त्याचा विस्तार करणे अशी काही गोष्टच उरत नाही..
No comments:
Post a Comment