नावावरून काही कळत नाहीये ना..तरकश ...मी वाचलेला जावेद अख्तरंच पहिला पुस्तक..खरच त्यांच्या लिखाणाबद्दल मी लिहिणं/बोलणं फारच वेडेपणाच ठरेल..काय सुंदर नाव आहे या पुस्तकाचं..In English it translates as 'quiver'..Quiver" means both the container for arrows as well as the delicate trembling of the lips just before the eyes well up with tears..दोन्ही अर्थ किती चपखल बसतात या पुस्तकाच्या नावाला..बंजारा..एक मोहरे का सफ़र..मेरा आंगन मेरा पेड़..आणि मध्ये मध्ये लिहिलेल्या अनेक ग़ज़ल..फार सुंदर लिहिलंय त्यांनी या पुस्तकात..मी कधी त्यांचं लिखाण वाचायचा प्रयत्नच केला नव्हता..मध्ये अचानकच शोधता शोधता या पुस्तकाचा नाव मिळालं..तरकश..वाचायला घेतलं आणि परत एकदा जाणीव झाली कि आपला हिंदी अगदीच बर म्हणण्याच्या लायकीच आहे..पण त्यांनी अवघड शब्दांचे अर्थ दिले आहेत बाजूलाच..पण त्यांच्या कवितांमध्ये एक इतका चांगला flow आहे कि अर्थ कळायला प्रत्येक शब्दा कळायची गरज वाटत नाही.. ज़िन्दगी न मिलेगी दोबारा किंवा नमस्ते लन्दन मधल्या त्यांच्या गाण्यांना तर तोड नाहीये..
त्यांच्या काही मला खूप आवडलेल्या गजल/गाण्यांमधल्या ओळी इथे लिहितीये..अगदी हिंदीतच म्हणायचं तर दिल को छु जाने वाले नगमे है ये..
हर ख़ुशी में कोई कमी सी है
हंसती आखोंमे भी नमी सी है
दिन भी चुप चाप सर झुकाये था
रात की नब्ज भी थमी सी है
ख्वाब था या गुबार था कोई
गर्दा इन पलकों पे जमी सी है
त्यांनी भरपूर सुंदर गाणी लिहिली आहेत..पण मला सगळ्यात जास्त नमस्ते लंडन मधली गाणी आवडतात..कदाचित माझ्या आवडता पिक्चर आहे म्हणून असेल पण काय सुंदर लिहिली आहेत गाणी..
त्यातल्या काही ओळी...
आरजू के मुसाफिर भटकते रहे
जितने भी वोह चले
उतने ही बिछ गएँ राह में फासलें
ख्वाब मंजिल थी और मंजिलें ख्वाब थी
रास्तों से निकलते रहे रास्तें
जाने किस वास्तें
आरजू के मुसाफिर भटकते रहे
किंवा दुसऱ्या एका गाण्यात वापरलेल्या या ओळी
उम्मीद तुने ए दिल खोई नहीं है
तेरी जिद में ये दिल सत आफरी है
क्यूँ ये जूनून है..क्या जुस्तजू है
आखिर तुझे क्यूँ ये आरज़ू है
किंवा
कल क्या होगा ये मत सोचो
तुम ये देखो की शाम के दामन में क्या है
इस शाम को जी भर के जिओ
कल जो भी होगा देखेंगे
हे वाचताना कळत कि कविता म्हणजे यमक जुळावण्यापेक्षा खूप मोठी गोष्ट आहे..अर्थ आहे..शब्दा इतकंच भावनांना पण महत्व आहे..खरच इतकी शब्दांवर पकड..भावनांचा विचार..अगदी आपल्यासाठीच लिहिला आहे असं प्रत्येकाला वाटतं ऐकल्यावर..
No comments:
Post a Comment