Sunday, February 5, 2012

Mehrooni...

               As it is already February lets get the Red (no no maroon) glasses on!! खूप दिवसांपूर्वी हा विडीओ पहिला होता मी..आज का काय माहित पण पुन्हा एकदा आठवण झाली त्याची.. खरच अगदी भरून येतं हि गोष्ट  बघताना..This is an excellent short film..Just a 10 minute film which takes us to a very different level of love..प्रेम..ज्या  गावाला आपण अजून गेलो नाही त्याचं प्रवास वर्णन कशाला लिहायचं!! सध्या तरी त्याबद्दल न बोललेलंच बरं..
             तर हि गोष्ट आहे Mr आणि Mrs  शर्मा यांची..मुंबईतल्या लाखो लोकांसारखे हे दोघे सुद्धा रोज लोकल मधून प्रवास करत असतात..आणि त्यांना बघणारा एक अनोळखी माणूस आपल्याला त्यांची गोष्ट सांगत आहे..खरच असं लोक म्हणतात कि खरं  प्रेम आता पुस्तकात, सिनेमात किंवा कवितांमधेच राहिलं आहे..पण मी बघितली आहेत माणसं, अगदी खरी खुरी एकमेकांवर निस्सीम प्रेम करणारी..अशीच या लेखकाला सुद्धा सापडली मुंबईच्या गर्दीत, सकाळच्या गडबडीत..एकमेकांचा हात धरून लोकल मध्ये चढणारी..आणि त्यांची हि गोष्ट..खरच अप्रतिम चित्रण आहे पूर्ण गोष्टीचं..फक्त एकमेकांसोबत एक तास जास्त घालवण्यासाठी एकत्र लोकल मधला प्रवास..आणि शेवटी एकंच बाही असलेलं स्वेटर घातलेले शर्मा साहेब..मला खूप भरून येतं हे बघताना..जमलं तर नक्की बघा तुम्ही सुद्धा..
           आपल्या हिंदी सिनेमांमध्ये शाहरुख खान ने सांगितलंच आहे "There is an extraordinary love story in every ordinary Jodi.." किंवा हॉलीवूड मध्ये सुद्धा तेच "The greatest love story ever told is your own!" आयुष्यातले हे सगळे आनंद अजून सुद्धा आहेत..ते कुठेही हरवत नाहीयेत..कदाचित आपण हरवतोय.. मी एकदा लिहिला सुद्धा होतं, खरच एकमेकांवर इतकं प्रेम करणारी माणस आहेत अजून..काका गेले आता तरीही अजून त्यांच्या आठवणी जपून ठेवणाऱ्या काकू आपल्याच शेजारी पाजारी असतात..आज्जी दमतात म्हणून त्यांना चहा करून देणारे आजोबा असतील..वाहिनीला उशीर होणार म्हणून जेवणासारखं काहीतरी बनवून ठेवणारा दादा असेल..आता तिच्यापासून परत दूर जाणार म्हणून अश्रू अवरु न शकणारा तो असेल..अगदी ट्रेन सुटेपर्यंत न सुटणारा हात असेल..ताई पोचेपर्यंत १०००० फोन करणारे जीजू असोत..आपल्याला आयुष्यभर नाही एकत्र राहता येणार या जाणीवेने आलेला तिच्या आणि त्याच्या डोळ्यातले अश्रू असोत..तिच्या वेदना न सहन होणारा तो असेल..त्याच्यासाठी सात समुद्र ओलांडणारी ती असेल.. किंवा या सगळ्यांना मूकपणे बघणारे आपल्यासारखे लोकही असोत..अशा लोकांकडे बघून नक्की काय वाटतं, ते लिहिता येणं अवघड आहे..पण एक नक्की अजून सुद्धा परी कथेतल्यासारख प्रेम आजूबाजूला दिसतंय..संदीप खरे नि म्हणालाय ना..
                                  अजून आकाश निळे , अजून गुलाब नाजूक आहेत
                                  अजून तरी दही दिशा आपल्या आपल्या जागी आहेत
                                  तसंच 
                                  अजून प्रेम तसेच आहे, मनामनात फुलत आहे..
                                  अजून सुद्धा कुणीतरी कुणासाठी झुरत आहे..
                                  
                                  अजून सुद्धा फेब्रुवारीत गुलाबांची विक्री होते..
                                  अजून सुद्धा नाक्यावरच्या गजऱ्याची  खरेदी होते..
           
                                   प्रेम करणारी माणस  काही आज उदयात थकत नाहीत..
                                   आणि इतक्या लवकर प्रेम हरवेल असे काही वाटत नाही..
(शेवटची तीन कडवी संदीप खरेची प्रलय कविता ऐकताना सुचली होती..ती सुद्धा एक खूप छान कविता आहे..मिळाली तर नक्की वाचा)

                                  

No comments:

Post a Comment