Sunday, January 8, 2012

A week full of ....

                  Almost every day of this week I was watching a movie or natak..Seriously every day!!! Started with a new marathi movie "झकास" with my mom..मजेशीर आहे तसा..एकदा बघायला हरकत नाही..तसं खास काही वेगळा नाहीये त्यात पण तरीही पूर्ण वेळ हसायला येतं..फार डोकं लावून बघण्याचा सिनेमा नाहीये हा..हसा आणि बाजूला ठेवा.. मी बघितला कारण मला अंकुश चौधरी आवडतो..आणि सई ताम्हणकर सुद्धा..मग मंगळवारी "पुन्हा सही रे सही"..खरच भारत जाधव ने काय काम केलंय त्यात..मी पहिल्यांदीच पाहिलं हे नाटक..मदन सुखात्मे, रंगा , गलगले , हरी..बाप रे..चार इतकी वेगळी व्यक्तीमत्व..एका वेळी एकाच रंगमंचावर!! काय गम्मत आहे का??? मला तर..मला तर "enjoy" , "जेवायला जेवायला जेवायला" , "शाब्बास गलगले" ...माझ्या तर डोक्यातच बसलं होतं सगळं..
                  मग दुसऱ्या दिवशी बाबांसोबत "मी नथुराम गोडसे बोलतोय" बघायला गेले होते..शरद पोंक्षेच काम खरच अप्रतिम आहे..ते जे बोलतात त्यात एक रुबाब आहे, असं वाटत कि खरच नथुराम गोडसे आपल्या समोर उभे राहिले आहेत..त्यांच्या बोलण्यातून / अभिनयातून नथुराम गोडसे प्रत्यक्षात असल्यासारखे वाटतं..सावरकरांबद्दल बोलतानाचा आदर..निर्वासितांच्या स्थितीबद्दल बोलतानाची तळमळ..अखंड सिंधूनदी ची स्वप्नं बघताना त्यावरचा विश्वास, गांधींबद्दलची मत मांडतानाचा आदरयुक्त विरोध..मृत्यूला न घाबरता सामोरं जाण, भविष्य माहित असताना सुद्धा वर्तमानात कुढत न बसण..अप्रतिम उभा केलंय त्यांनी..नाटक बघून झाल्यावर मन अगदी सुन्न झालेला असतं..खूप प्रश्न येतात ज्यांची उत्तर आपल्या कक्षेच्या बाहेर असतात..
                 त्यानंतर "sherlock holmes"..A lot has been said about that movie so not really much to say or write..
And then my all time favorites at home..Rajshri movies, DDLJ etc etc..I wish they show all these movies in theaters.. 

1 comment:

  1. rashmi ani sohan sobat moviela jayacha ani tyanchya madhe basayacha!!

    ReplyDelete