Sunday, January 22, 2012

A journey..may be to discover

                          This is some part of my travel log during my journey back to Dallas..I was just reading it after coming here..I thought of some part can be shared..I do not want to claim that this one is unedited version or complete version.(well whatever is written is unedited but you know the kind of a person I am, I will not write everything!!) So these are just some paras from the log.

             आज विचार आला, एकदा लिहावं बसून जे काही मनात येतंय ते..सलील कुलकर्णींचा "लपवलेल्या काचा" वाचताना असं मनात आलं..हे पुस्तक मला पूर्ण प्रवासभर पुरवायचं..:(..तर हि कल्पना मिळाली सलील कुलकर्णींच्या लेखातून..रात्रभर जागं राहून लेख लिहिण्याच्या प्रयत्नातून..
            आज खूप खूप भरून आलाय.असं वाटत काहीतरी चुकतंय..कदाचित परत जाण असेल..काल एकाच रात्री प्रचंड विचारांचा ताण मेंदू सहन करू शकल्याने, तो shut down झाला होता..सगळं काही खाऊन घेतलंय डोक्याने..आता फक्त रवंथ!! रवंथ वरून आठवलं, आता छान कॉफी पिणार..कॉफी पिऊन मेंदूला चालना मिळणार(?)..खरंच caffine रक्तात भिनत असतं तर कधी कधी माझ्या रक्तात RBC/WBC पेक्षा तेच जास्त झालं असतं..असो..ती फ्रेंच कॉफी प्यायाचीच राहिली..एवढ्या हौसेने मी ती किवळकरांकडून आणली होती..माझं अक्षर का एवढा खराब येतंय?? विचारांचा आणि लिहिण्याचा वेग एकमेकांपेक्षा इतका वेगळा का असतो? बर्र आणि किवळकर चहावाल्यांकडे लोक साड्या घ्यायला कसे येऊ शकतात?? अशा मजेशीर गोष्टी पुण्यातच होऊ शकतात..
            .....................................
            जायचे..पोचायचे इतुके मज ठावे...छान गाणं आहे ना..
            ................................................
            आता वाटतंय जरा अजून घरी राहिले असते तर बारा झालं वाटतं..आता विचार तर खूप येत आहेत..पण कागदावर उतरवणं किती अवघड वाटतंय..
           .....................................................
           कितने दफे दिल ने कहा..दिल कि सुनी कितने दफे..
           खरंच मला मानाने किती वेळा सांगितलं आणि मी माझ्या मनाचं किती वेळा ऐकलं? हिशोब लावणं अवघड आहे ना ? मनाचा problem असा आहे कि ते सांगतच रहातं , पण आपण तशी किंवा त्यावर कृती करायची कि नाही ते आपल्यावर सोडतं आणि आपण कुणावर? बापरे असले अवघड प्रश्न नकोत आणि त्या प्रश्नांची सोपी उत्तरं तर त्याहूनही नकोत..
             ...........................................................
              लोकं आईला म्हणतात, तुम्ही भाजी घ्यायला गेल्यासारखं पटकन लातूरला जाऊन येता !! खरंच आहे म्हणा , आम्हाला लातूरला जायला तयारी/ तिकीट/त्रास असल्या "तकार" गोष्टी मध्ये येत नाहीत..अरेवा "तकार" आपला नवीन शब्द...
              ............................................................
             एक धागा पकडून होणारा विचार..म्हणजे काय असतो? आधीच विचार करण्याचा छंद आहे मला..आता एक धागा पकडून होणारा विचार यावर सुद्धा विचार...
              .............................................................

1 comment: