आज साताऱ्याला गेले होते..मी आणि सपना काका काकूंना भेटायला गेलो होतो..खरच काकूंच्या हातचं जेवण म्हणजे मेजवानीच असते..You need to be very very lucky for that!! :)...छान दिवस घालवला आजचा..काका-काकू, the great naikwadi brothers, तन्वी , अमान-अयान , संस्थानिक आणि मावशी..वेळ कसा नी कधी गेला ते कळलाच नाही..
काकूंचा आग्रहाने खूप खूप जेवायला वाढणं, काकांचे किस्से आणि अनुभव..जुबेर आणि परवेझ ची चेष्टा..काकू काय मस्त जेवण बनवतात कि माणूस एका वेळी किमान दोन वेळेच जेवून परत येत..काका एवढ्या प्रेमाने विचारपूस करतात आणि सांगतात कि खूप खूप छान वाटतं..आणि हो असाही प्रश्न पडतो कि एवढ्या चांगल्या आईबाबांना एवढी विचित्र मुल कशी मिळाली!! :):):):)
साताऱ्यातून निघताना, इतका जड जात असतं मला आणि सपनाला कि काय सांगू..असं वाटत कि अजून थोडा वेळ थांबता आलं तर किती बरं होईल..खरच आयुष्यात अशी लोक सोबत असली तर आणखी काही असण्याची गरजच वाटत नाही..बाबा नेहमी म्हणतात, चांगली लोक भेटायला खूप नशीबवान असावं लागतं..
खरच..आयुष्यात अशी लोक असणं किती महत्वाचा असतं हे कळत..इतकी चांगली चांगली लोक पदोपदी सोबत असताना एकटेपणाचं रडगाणं कशाला!! उगाचच म्हणत बसायचं का कि मी एकटीच राहते वगैरे वगैरे..सलील कुलकर्णींच्या एका लेखात त्यांनी म्हणलं होतं एकटेपणा दाखवायची fashion चं आली आहे सध्या..अर्रे इतकी सगळी लोक एका फोनच्या अंतरावर आहेत ना आपल्या..माझ्याकडे एक सल्ला आहे आपल्या सगळ्यांसाठी..पुढच्या वेळी एकट वाटला ना कि मला फोन करा.. :):):) (I will try my best to pick it up, my record isnt good though!!) मजेचा भाग वेगळा..खरच हा सल्ला उपयोगात आणून तर बघा ना , (मला फोन करायचा नाही) तर अशावेळी एका व्यक्तीला फोन/मेल करायचा जिच्याशी/ज्याच्याशी खूप दिवसात बोलणं नाही झालं..खूप खूप छान वाटेल..आणि जर मी त्या व्यक्तींपैकी एक असेल तर मला पण खूप खूप छान वाटेल:):)..आता लवकर कोणाला तरी एकटेपणा जाणवू दे म्हणजे मला फोन येईल!! :):):
No comments:
Post a Comment