असंच रोज संध्याकाळी बसून सुंदर सूर्यास्त बघावा..
तो मावळणारा सूर्य..आकाशाचा केशरी रंग..
हळूहळू बदलत जाणाऱ्या निळ्या रंगाच्या छटा..
आणि त्याबरोबर बदलणारे माझे विचार..
मग हळू हळू येणारी रात्र..तिच्यासोबत येणारा चंद्र..
चंद्रप्रकाशात न्हाऊन जावं..पाण्यात पाय टाकून चहा प्यावा..
मनातलं लिहावं..काहीतरी वाचावं..
काहीतरी सांगावं आणि काहीतरी ऐकावं..
उधाणणाऱ्या या वाऱ्यावर द्यावे स्वतःला झोकून..
शांतपणे फक्त वाऱ्याचच गाणं ऐकावं थांबून..
ऐकावं त्याचंही म्हणण कधीतरी..
सांगावं त्यालाही गुपित कधीतरी..
सकाळी थांबून आरामात सूर्योदय पहावा..
नवीन उमेद आणणाऱ्या त्या ताऱ्याची थोडी उर्जा घ्यावी..
त्याच्याकडून उमेद घ्यावी..
आणि त्याला संध्याकाळी भेटण्याची हमी द्यावी!!
No comments:
Post a Comment