Sunday, October 9, 2011

दसरा

          दसरा..I miss being home!! सकाळ मधले सीमोल्लंघनाचा अर्थ नव्याने समजावून देणारे लेख, गाडगीळान्कडची गर्दी(खरच सगळं जग तिथे सोन घ्यायला आलेलं असतं), पाटीवर काढलेली सरस्वती, शस्त्रपूजेसाठी काढलेलं सगळं सामान(घुंगरू, वाद्य, आवडतं पेन, पाटी, पुस्तकं,nunchaku)...संध्याकाळी जोशी काका, प्रतिभा मावशी, फडके काका,शेजारच्या काकू,  मुंढे काकूंकडे जाऊन सोनं देऊन यायच आणि भरपूर गप्पा पण मारून यायच्या..I am missing all that..
          दसरा, ज्या दिवशी रामाने रावणावर विजय मिळवला, दुर्गा मातेने महिषासुरावर विजय मिळवला, पांडवांनी अज्ञातवास संपवला असा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त..दसर्याच्या किंवा विजया दशमीच्या प्रत्येक गोष्टीमागे एक समान धागा आहे, तो म्हणजे दुष्ट प्रवृत्ती, वाईट गोष्टींवर मिळवलेला विजय..दसऱ्याला सीमोल्लंघन करण्याची सुद्धा पद्धत आहे...
        रावणाची दहा तोंडं म्हणजे खरंतर आपल्यामध्ये असलेल्या १० वाईट गोष्टी आहेत..रामाने रावणावर विजय मिळवला म्हणजे त्याच्या या १० वाईट गोष्टींचा (क्रोध, मोह, लोभ, मद, मत्सर इत्यादी) नाश केला..रामाचा रावणावर विजय आपल्याला ह्या दृष्टीकोनातून सुद्धा बघता येईल..
         याच दसऱ्याच्या मुहूर्तावर दुर्गा मातेने महिषासुराचा वध करून, आणि म्हणूनच आपण देवीला महिषासुरमर्दिनी असं म्हणतो..नऊ दिवस चाललेलं ते युद्ध अश्विन शुक्ल दशमीला संपलं म्हणून हि विजया दशमी..
         मला सगळ्यात महत्वाचं वाटत ते सीमोल्लंघन..समासच सोडवायचा झाला तर सीमेचं उल्लंघन..हि सीमा भौगोलिकच असायला हवी असंही नाही..कारण त्यांचं उल्लंघन मुहूर्त बघून करणं थोडसं अवघड आहे..;);) कदाचित आपणच आपल्यासाठी निर्माण केलेल्या सीमा असतील या..सीमा आपण आपल्या विचारांवर लादलेल्या..सीमा आपण आपल्या कार्यक्षमतेवर आखलेल्या..सीमा आपण आपल्या सामाजिक वर्तुळावर ठेवलेल्या..सीमा आपण स्वतःवर , स्वतःच्या क्षमतेवर आखलेल्या(मी फक्त ३ मैल पळू शकते असं ठरवण हि सुद्धा सीमाच आहे ना!!)..याच सीमांचं उल्लंघन करणं, त्यांच्या पलीकडे जाऊन काहीतरी करणं म्हणजे सीमोल्लंघन..रोजच्या पेक्षा आज एखादा मैल जास्त पळणं, नेहमीपेक्षा वेगळ्या लोकांशी बोलणं, स्वतःवर स्वतःच लादलेली limitations काढण, मी हे सुद्धा करू शकते याचा अनुभव घेणं म्हणजेच सीमोल्लंघन आहे माझ्या दृष्टीने..

No comments:

Post a Comment