Sunday, August 28, 2011

आजच एक post पाहिला facebook वर..
" एक नवीन म्हण ... बाहेर विचारात नाही कुत्र आणि फेसबुकवर हजारो मित्र...!"

अगदी खरय!! मला खरच काही लोकं माहित आहे, ज्यांच्या आयुष्याचं ध्येय फेसबुक वर सर्वात जास्त मित्र बनवायचे असंच असावं...हल्ली लोकं हळू हळू खूप "social" होत चालली आहेत!! मला काळातच नाही अजूनही, कि ज्या लोकांना कधी आपण भेटलो नाही, ओळख सुद्धा नाही त्यांना कशाला फेसबुक वर add करायचं?

ते बाजूला ठेवूया, म्हणीवर लक्ष केंद्रित करायला हवं!! ज्याने कोणी हि म्हण शोधली आहे, फार फार भारी माणूस असला पाहिजे!!मला प्रचंड आवडलेली आहे हि म्हण!! मजेशीर आहे हि म्हण अगदी!! 

मला तर वाटतंय कि काही दिवसांनी, स्वताची ओळख सांगताना लोकं सांगतील,
माझा नाव "अमुक तमुक" आणि मला फेसबुक वर ८४५ मित्र आहेत!! 

अर्रे आवरा या लोकांना..किंवा कदाचित लोकांच्या resume वर असा लिहिलेला असेल,
Highly proficient with Facebook, already achieved 673 friends..
अर्रे काय हे..पण अशी लोकं असतात फारच भारी!!

मी एक album बघत होते, album चा नाव "Our first Anniversary".
आता एकेका फोटो खाली काय काय लिहिलं होतं ते वाचून तर मी कितीतरी वेळ हसत होते!!
१. तयार होताना..
२. अर्रे आपण इथे आलोय!! (हॉटेल चा फोटो) आणि फेसबुक वर "check in".
३. इथे हे सगळं मिळतं??(menu card चा फोटो )
४. अर्रेवा जेवण!!(जेवणाचा फोटो)
५. आता गोड काहीतरी!!(desert चा फोटो)
६. आणि मध्ये मध्ये एकमेकांचे फोटो!!!

आता यात गमतीचा भाग असा कि हे सगळे मोबाईल updates होते!!
एकमेकांपेक्षा फेसबुक मधेच जास्त लक्ष!!

जर मी अशीच लिहित राहिले तर म्हण बाजूला राहील आणि किस्सेच किस्से लिहिले जातील.
तुम्ही म्हणीवर लक्ष केंद्रित करा!! बाकी सगळ्या common गोष्टी आहेत..

No comments:

Post a Comment