खरंच काही गोष्टी कधीच नाही बदलत..आजच अचानक एक पुस्तक मिळालं, बालभारती आणि कुमारभारती मधल्या कविता!! कुमारभारती सोबत माझा फारसं जवळचं नातं नाहीये, पण बालभारती!! अजूनही बालभारती मधल्या कविता वाचायला मला आवडतात, आणि गम्मत म्हणजे, मी त्या तीनदा शिकले आहे, एकदा मी पहिली ते चौथी मध्ये असताना, मग गौरी, आणि नंतर अनिकेत..त्यामुळे अगदी पाठ झाल्या आहेत त्या कविता!! आणि गम्मत म्हणजे त्यातल्या काही कविता तर बाबांनी सुद्धा शाळेत असताना शिकल्या होत्या आणि त्या सुद्धा त्याच चालीत!!
आत्ता हे पुस्तक वाचून खूपच चं वाटतंय!! अगदी चालीसकट आठवत आहेत त्या कविता!!
काळ्या काळ्या शेतामंदी घाम जीरव जीरव
तेंवा उगलं उगलं कायामधून पिवय..
त्याच चालीत जाणारी अजून एक कविता म्हणजे,
काळ्या मातीत मातीत तीपण चालती
तीपण चालती तीपण चालती..
आणि अजून एक
मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर
किती हाकलं हाकलं फिरी येते पिकावर..
किती छान वाटतंय मला..अगदी श्रावण माशी हर्ष मानसी म्हणाल्यावर वाटायचं तसं!!
कविता नुसत्या नाही, चालीतच वाचल्या जातात..आणि सोबत कवी/कवियित्रीन्ची नावं सुद्धा जशी पाठ केली होती तशी आठवतात..अजून उदाहरणच द्यायची तर
राजस जी महाली सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या..
त्याच चालीतलं
आई म्हणोनी कोणी आईस हक मारी..
ती हाक येई कानी मज होय शोककारी..
किती लिहू आणि आणि किती नाही असा झालंय..कित्येक कविता आणि त्यांच्या आगी डोक्यात पक्क्या बसलेल्या चाली..It is really really overwhelming!!
माझी सगळ्यात आवडती कविता
आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे
वरती खाली मोद भरे वायुसंगे मोद फिरे..
आणि या कविता विसरणं थोडा अवघडच आहे, मध्ये माझ्या हाताला तवा चांगलाच भाजला होता,
एका दिवशी skype वर बोलताना ते आईला दिसलं, तर आई लगेच म्हणाली
अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके मग मिळते भाकर..
किंवा अनिकेत लहानपणी ते "गवतफुला रे गवतफुला" जोरजोरात म्हणायचा!!गौरीचं टपटप टपटप अगदी ठसक्यात असायचं..आई अजूनही कितीतरी वेळा उठ उठ हो चिऊताई म्हणते!!अजूनही खंडाळ्याजवळ "कशासाठी पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी" कारण तोपर्यंत मला आणि गौरीला भूक लागलेली असते!! :):)
किती तरी आठवणी आहेत कवितांसोबत.किंवा नेहमी वापरल्या जाणाऱ्या काही ओळी..
देणाऱ्याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणाऱ्याचे हात घ्यावे
ने मजसी ने..
बहु असोत सुंदर संपन्न कि महा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा..
खरंच खूप दिवसांनी या सगळ्या कविता वाचल्या आणि खूप खूप छान वाटतंय!! तुम्हाला अजून कोणत्या आठवत असतील तर नक्की लिहा!!
Nice Post!
ReplyDeleteMala ashi athavanari mhanje 'Vedat marathe..'. Sampurna kavita khup chan ahe, nakki vach.. http://www.aathavanitli-gani.com/Song/Vedat_Marathe_Veer