चाललाय प्रवास..
कुठे कोणत्या दिशेने किती वेगाने..
कदाचित गणित नसेल मांडलेलं..
पण गणित मांडलं नाही म्हणून प्रवास चुकत नाही..
समोरच काही दिसत नाही म्हणून थांबता येत नाही..
गणित मांडाव म्हणतात..
म्हणजे मिळेल एक दिशा..
पण सगळेच parameters आधीपासून माहित असत नाही..
constants सुद्धा कधी variables होतील सांगता येत नाही..
statistics चे theorems मग आठवतात..
Random variables सुचायला लागतात..
शिकालेले सगळीच तत्वं लागू होतीलच असं नाही..
theorems/ exceptions सगळं मांडू शकतील असंही नाही..
निर्णय सुद्धा घ्यावे लागतात..
कधी खूप सोपे तर कधी अगदी कठोर..
decision making ची तत्वं लागू होतातच असं नाही..
पण म्हणून निर्णय घेणारच नाही असही करता येत नाही..
आयुष्य fair नाहीये..
हे काही बरोबर नाहीये..
प्रत्येक वेळी गोष्टी logical असतील असं नाही..
पण म्हणून त्या चुकीच्या असतील असंही नाही..
माझा वेग ताशी सत्तर..
मला लागतील तास दोन..
रस्ता सरळ असेलंच ह्याची हमी नाही..
मजा सरळ रस्त्यावरच येते असं तर त्याहून नाही..
खूप झालं आता कंटाळा आला..
काय हे मी कुठे पोचतही नाहीये..
अर्ध्यात प्रवास सोडता येईलच असं नाही..
पण उरलेला प्रवास पूर्ण होईल असंही नाही..
खरच म्हटलंय कुणीतरी..
हा प्रवास आहे अज्ञाताकडे..
लांबचा पल्ला गाठायचा म्हणून धावूनही चालत नाही..
बरंच पुढे आलो म्हणून थांबूनही चालत नाही..
Kya baat hai!!
ReplyDelete